पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 447 मतदारांनी केले गृह मतदान

85 वर्षांवरील 409 मतदारांचा तर 38 दिव्यांग मतदारांनी केले मतदान

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 447 मतदारांनी केले गृह मतदान
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 447 मतदारांनी केले गृह मतदान

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 447 मतदारांनी केले गृह मतदान

          - निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

85 वर्षांवरील 409 मतदारांचा तर 38 दिव्यांग मतदारांनी केले मतदान 

पंढरपूर दिनांक 16 : सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघात यंत्रणेने नागरिकांच्या घरी जाऊन मतदान घेतले. मतदारसंघात एकूण 447 मतदारांनी गृह मतदान करून समाधान व्यक्त केले. यात 85 वर्षांवरील 409 मतदारांचा तर 38 दिव्यांग मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.पंढरपूर विधानसभा मतदारसंघात दि.14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान घेण्यात आले.गृहमतदानासाठी नमुना 12 डी भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या 20 पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात आली होती. असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्री इथापे यांनी सांगितले. आहे